गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. विकास कशाळकर यांचा मंगळवारी अमृत महोत्सवी सत्कार सोहळा!
पुणे : भरत नाट्य मंदिराच्या भरत नाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे मंगळवार, दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. कशाळकर यांचा सत्कार केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. कशाळकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांना पंडित पांडुरंग मुखडे (तबला) आणि प्रविण कासलीकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
डॉ. विकास कशाळकर
सत्कार सोहळ्यापूर्वी ‘यमनरंग’ या सांगीतिक कार्यक्रमात भरत नाट्य संशोधन मंदिराच्या बिल्वा द्रविड व विद्यार्थी यांचे गायन होणार आहे. त्यांना ओंकार श्रोत्री (तबला), नितीन पुरंदरे (संवादिनी) साथ करणार आहेत. विकास कुचेकर, अमित लिमये, केतकी वैद्य-गोडसे, ओंकार श्रोत्री यांचे एकल तबलावादनही होणार आहे. भरत नाट्य मंरिदाचे विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे यांचे विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पंडित डॉ. विकास कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील गायक आणि गुरू आहेत. त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेतले असून ग्वाल्हेर पद्धतीच्या संगीताचे शिक्षण त्यांनी ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि गायक पंडित गजाननराव जोशी यांच्याकडून गुरू-शिष्य परंपरेने घेतले आहे. अनवट राग सोपे करून अत्यंत तन्मयतेने शिकविणारे, सात्विक व मृदू स्वभावाचे डॉ. कशाळकर हे विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहेत.
_________________________________________
जाहिरात