गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान’ !
डॉ. दीपक शिकारपूर यांच्या 57व्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा !!
पुणे : विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता विश्वकर्मा विद्यापीठ, लक्ष्मीनगर, कोंढवा येथे आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. शिकारपूर यांचे हे 57 वे पुस्तक आहे. प्रकाशन सोहळ्यानिमित्त विलो माथेर आणि प्लॅट पंप्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत वाटवे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यात विश्वकर्मा विद्यापीठ आणि विश्वकर्मा ग्रुपचे अध्यक्ष भरत अगरवाल, सेवा इन्फोटेक आणि साकार रोबोटिक्सचे संस्थापक मनोज पोचट, आकार फाउंड्रीचे सीईओ जितेंद्र लखोटिया, सी-टेक इंजिनीअर्सचे संचालक अविनाश चाबुकस्वार यांचा सहभाग असणार आहे.
__________________________________________
जाहिरात