गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सहजीवन गणेश मित्र मंडळातर्फे श्रींची स्थापना
पुणे : सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट येथे विधिवत आणि मोठ्या भक्तीभावाने श्रींची स्थापना करण्यात आली.
श्रींची प्रतिष्ठापना श्री वासुदेव निवासचे विश्वस्त देविदास जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाचे उत्सव अध्यक्ष विनय कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, मंडळाचे सभासद विजय ममदापूकर, प्रसन्न जावडेकर, सोहम कुलकर्णी, अतुल उरणकर, युवराज नातू, रोहन भोसले आदी उपस्थित होते.
सहजीवन गणेश मित्र मंडळाची श्रींची
सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालवाद्यांचे विविध रंग उलगडून दाखविणारा ताल परिक्रमा हा कार्यक्रम समीर सूर्यवंशी दि. 12 रोजी सायंकाळी 5:30 सादर करणार आहेत. दि. 13 रोजी 21 मान्यवर गायकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दि. 14 ला विविध गुणदर्शन, दि. 15 ला रांगोळी स्पर्धा तर सायंकाळी 5:30 वाजता नमस्ते बॉलीवूड हा कार्यक्रम राधा मंगेशकर आणि राजेश दातार सादर करणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. 16 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
__________________________________________
जाहिरात