गोल्डन आय न्यूज नेटवर्क
🏆🎉अभिनंदन 🏆🎉अभिनंदन 🏆🎉
Pune : संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा *पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यास 2023 स्पर्धेत आपल्या संयुक्त प्रसाद मित्र मंडळाला केळकर रोड विसर्जन मिरवणूक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
Xस. प. महाविद्यालय लेडी रमाबाई हॉल मध्ये झालेल्या बक्षिस समारंभास अप्पर पोलिसआयुक्त श्री.प्रवीण कुमार पाटील साहेब,
पोलिस उपायुक्त श्री.संदीप सिंह गिल्ल साहेब, विघ्नहर्ता न्यास चे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई सर, पुणे परिवार चे आप्पा घाटे उपस्थित होते.
मंडळाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते, जाहिरातदार, वर्गणीदार यांचे मनःपूर्वक आभार…!
तसेच
बाप्पाच्या विसर्जन शिस्तबध्द मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाचे अतिशय पेशन्स ठेऊन सहभागी झालेले सर्व बाल कार्यकर्ते, दमलेल्या असूनही “मंडळाचे सामाजिक फलक” घेऊन अनेक तास चालणाऱ्या सर्व महिला कार्यकर्त्या, पोलिसांच्या विनवणी करत, दुसऱ्या मंडळाच्या लोकांना समजावत, आपल्या मिरवणुकीतील महिलांना, मुलांना गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून वेळ प्रसंगी भांडणं करून शिस्तबध्द मिरवणूक पुढे नेणारे मंडळाचे पुरुष कार्यकर्ते या सर्वांना मानाचा मुजरा…
पुन्हा एकदा पोलीस विघ्नहर्ता न्यासचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन… 💐
–
कार्यकारिणी
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
नारायण पेठ पुणे
__________________________________________
जाहिरात