गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*स्त्री शक्ती फाउंडेशन च्या गणेशमुर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद* !!
पुणे :-येथील स्त्री शक्ती फाउंडेशन अंतर्गत अध्यात्मिक गजानन बालसंस्कार केंद्रा तर्फे शाडुच्या मातीपासुन गणेशमुर्ती बनविण्याची निःशुल्क एकदिवशीय आॕनलाईन कार्यशाळा उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.
या आॕनलाईन कार्यशाळेचे आयोजन स्त्री शक्ती फाउंडेशन च्या संस्थापिका सौ.अर्चना ईश्वर सोनार यांनी केले होते.
प्रमुख अतिथी म्हणुन वंशावळी डाॕट काॕम चे संस्थापक संचालक विकास विसपुते ,सुवर्ण जागृतीचे संपादक अमोल बुटे ,अध्यात्मिक ज्ञान प्रसारक पत्रकार आत्माराम ढेकळे,रुग्वेद सुवर्णवार्ता चे संचालक दिनेश येवले हे उपस्थित होते.कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून समर्थ कर्णे व सार्थक कर्णे यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.विविध भागातील ८९ प्रशिक्षणार्थी मुलांचा सहभाग होता.शाडुच्या मातीपासुन इको फ्रेंडली गणेशमुर्ती बनविण्याची ही सहावी कार्यशाळा होती.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भरपुर प्रतिसाद मिळाला.कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांचा त्यांच्या कार्याच्या आढाव्यानुसार परिचय अर्चनाताई सोनार यांनी करुन संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.तसेच कार्यक्रमाची रुपरेषा नमुद करुन मार्गदर्शन केले. कार्यशाळेत समर्थ कर्णे व सार्थक कर्णे यांनी शाडुच्या मातीपासुन गणपती बनवित असतांना बारीक- सारीक गोष्टी प्रशिक्षण देत असतांना मुलांना समजावुन सांगितल्या.ही शाडु माती एक/दोन दिवस भिजवुन ठेवायची म्हणजे चिकटपणा व नरमपणा येतो.घरगुती काही बाबी वापरुन कशा पध्दतीने गणपती बनविता येईल.याचे उत्तम सादरीकरण त्यांनी केले.
अशा या अप्रतिम कला कौशल्याच्या कार्यशाळेचे आयोजन व संयोजन उत्कृष्टरित्या केल्याबद्दल अर्चनाताईचे मान्यवरांनी कौतुक करुन अभिनंदन केले.प्रामुख्याने याप्रसंगी विकास विसपुते हे या कार्यशाळेतील सादरीकरण व कला कौशल्य पाहुन प्रभावित झाले.व मुलांचे भरभरुन कौतुक केले.मुलांच्या सुप्त गुणाचा विकास होणेसाठी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या संस्काराचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तर श्री गणेशाची मुर्ती बनविणे म्हणजे अध्यात्मिक/धार्मिक संस्कृती टिकवुन ठेवणे आहे.व ही कला देवाची देणगी आहे.असे पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तर अमोल बुटे व दिनेश येवले यांनीही या मुलांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आभार प्रदर्शना नंतर कार्यशाळेची सांगता झाली.
__________________________________________
जाहिरात