गोल्डन आय न्यूज नेटवर्क
१ सप्टेंबर २०२४
भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर !!
Pune : पुणे शहरातील डेंग्यू मलेरिया ची साथ आणि रक्ताचा तुडवडा लक्षात घेऊन नारायण पेठेतील
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ व लायन्स क्लब पुणे सनराइज यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. . या शिबिरामध्ये 226 नागरिकांनी सहभाग नोंदवला.
मोफत आरोग्य तपासणी मध्ये हिमोग्राम, ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल,कोलेस्ट्रॉल, थायरॉईड इत्यादी महत्त्वाच्या तपासण्या केल्या गेल्या. विघ्नहर्ता क्लिनिकचे डॉक्टर आशुतोष भिसे, आणि डॉक्टर प्रियांका हुरदळे यांचे सहकार्य मिळाले. रक्तसंकलासाठी सह्याद्री हॉस्पिटल रक्तपेढी सुजाता नाईक मॅडम, शुभांगी अधिकारी मॅडम व टीम चे विशेष सहकार्य मिळाले.
रक्तदान शिबिरात तरुण आणि महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
यावेळी युवा उद्योजक पुनीतजी बालन, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत भाऊ रासने, कार्यक्षम नगरसेवक राजेश दादा येनपुरे, सेवा मित्र मंडळाचे शिरीषभाऊ मोहिते, तुळशीबाग मंडळाचे नितीनजी पंडित, कुमारजी रेणूसे, साईनाथ मित्रमंडळाचे पियुषजी शहा, रा. स्व. संघाचे मोतीबाग नगर कार्यवाह श्री. प्रमोद वसगडेकर, लायन्स क्लब ऑफ पुणे सनराइजचे अध्यक्ष प्रदीपजी खोजे, हरीशजी चौहान, क्षितिज धायरकर, विजय क्रिकेट क्लब मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव कदम, मुंढवा येथील आरोग्य सामाजिक कार्यकर्ते, रूपा फाउंडेशनचे अध्यक्ष सागरजी भंडारी, एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीरजी ढमाले , पार्वती कन्स्ट्रक्शनचे किरीटभाई शहा, जुन्नर मधील सामाजिक कार्यकर्ते विकास घोगरे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी युवा उद्योजक, शार्प इलेक्ट्रॉनिक्स चे पुणे जिल्हा वितरक विनोदजी सांखला यांचे विशेष सहकार्य मिळाले.
मंडळाचे पदाधिकारी अमोल भालेराव, कुणाल आहेर यांनी श्री. पुनीतजी बालन यांचे स्वागत केले.
आपला
कार्यकारिणी
संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
नारायण पेठ पुणे 30
__________________________________________
जाहिरात