गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘पुरुषोत्तम’च्या अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड करण्यात आली असून अंतिम फेरी दि. 21 व 22 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या कालावधीत 51 संघांचे सादरीकरण झाले. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघांची आज (दि. 30) निवड करण्यात आली. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण केले.
स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, दि. 21 सायंकाळी 5 ते 8 आणि तर रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळात भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
‘आव्वाज कुणाचा..’
अंतिम फेरीसाठी निवडलेले संघ (महाविद्यालयाचे नाव आणि एकांकिका या क्रमाने)
बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (बिजागरी)
म. ए. सो.चे सिनिअर कॉलेज (तेंडुलकर्स्)
स. प. महाविद्यालय, पुणे (पार्टनर)
आय. एम. सी. सी. (सखा)
न्यू आर्टस् कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर (देखावा)
विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी)
गरवारे वाणिज्य महाविद्यालय (बस नं. 1532)
डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (तृष्णाचक्र)
फर्ग्युसन महाविद्याल (11,111)
अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके (नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय) या क्रमाने
वैभव वासणकर (आबा/वासुदेव, भ्रीडी, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी बी. स्कूल)
मिहिर माईणकर (जीवन साठे, जीवनसाठे अंडरग्राऊंड, सी. ओ. ई. पी. तंत्रज्ञान विद्यापीठ)
शर्वायु ढेमसे (आबा, निर्वाण, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
वेदिका वाबळे (रत्ना, समुद्र बिलोरी ऐना, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड कॉम्प्यूटर स्टडिज)
ऋतिक रास्ते (सुरज बनकर, फिर्याद, टी. जे. कॉलेज कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय)
रुपाली सोनवले (रूपा, थँक यू..!, अण्णासाहेब मगर महाविद्यालय)
राजसी वळामे (नेत्रा, स्कीम, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)
केदार लगस (मास्तर, शाळा तपासणी, एन. बी. एम. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट)
सोहम देशपांडे (पात्र, अरे आवाज कोणाचा..?, भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय)
अविष्कार ठाकूर (आनंद, अय, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर)
उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक
ऋतुराज दंडवते (अय, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर)
उष्ोजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शिका
वैष्णवी जमदाडे (निर्वाण, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
दर्जा खालावलेले संघ (एकांकिका, महाविद्यालय क्रमाने)
आता वाजव (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय)
तो का आपण (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय)
चालुनी जावे (नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय)
मेघ गगनाविना बरसले (पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)
विमोचन (पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय,शिवाजीनगर)
स्कीम काय? (मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय)
फर एव्हर अलोन (ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, पुणे)
जिना (नौरोसजी वाडिया महाविद्यालय)
सत्त्याण्णव पावसाळे आणि मुसळधार पाऊस (विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब, वालचंदनगर)
अल्ट-कंट्रोल-डिव्हिजन (सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग)
__________________________________________
जाहिरात