गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालयात रविवारी गायन मैफल
पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि नादरुप संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 25) गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मैफल दोन सत्रात शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या सत्रात सकाळी 9 ते 12 या वेळात प्रद्युम्न नाडगौडा, मुग्धा लेले, विनय कोहाड आणि कन्हैया भोसले यांचे तर दुसऱ्या सत्रात सायंकाळी 6 ते 9 या वेळात अथर्व अभयार्पिता, डॉ. प्रकाश कुलकर्णी, जयंत केजकर आणि मधुवंती देव यांचे गायन होणार आहे.
पं. प्रमोद मराठे, अमेय बिच्चू, श्रीपाद शिरवळकर, सौरभ क्षीरसागर, निलय सालवी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
_________________________________________
जाहिरात