गोल्डन आय न्यूज नेटवर्क
इतिहास शिक्षक महामंडळातर्फे रविवारी शिक्षकांचा गौरव
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या इतिहास शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र आयोजित पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता उद्यान कार्यालय, *उद्यान प्रासाद*, 1712/1 ब, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. डॉ. अ. रा. कुलकर्णी, डॉ. अरविंद देशपांडे, *गुरुवर्य म. कृ. केरुळकर*, डॉ. सुमन वैद्य पुरस्काराने शिक्षकांना गौरविले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मराठी मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी इतिहास शिक्षक महामंडळाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
जाहिरात