गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे शनिवारी संविधान सन्मान सभा !
विश्वसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र खंड 1 ग्रंथाचे
खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन !!
डॉ. सुखदेव थोरात, बाळासाहेब थोरात, रमाकांत खलप यांची असणार प्रमुख उपस्थिती !
पुणे : संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे शनिवारी (दि. 24) संविधान सन्मान सभा आणि संविधानाचे शिल्पकार विश्वसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र खंड 1 या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात पुण्यात होणारा पहिलाच कार्यक्रम आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला असून ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात असणार आहेत.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांची प्रमुख उपस्थिती असणार असून खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, आमदार रवींद्र धंगेकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, आमदार कैलास पाटील यांची सन्मानीय उपस्थिती असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, संयोजक विराज तावरे, दीपक चांदणे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. प्रतिमा पब्लिकेशन्सतर्फे हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे.
संविधान संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी अविरत कार्य करणारे डॉ. विजय खरे, रतनलाल सोनग्रा, विकास पासलकर, युवराज शहा, रवींद्र माळवदकर, ॲड. भरत मोरे, राजवैभव शोभा रामचंद्र, लताताई राजगुरू, विठ्ठल गायकवाड, पैगंबर शेख, सुलक्षणा शिलवंत, डॉ. मच्छिंद्र सकटे, डॉ. शिवाजी जवळगेकर यांच्यासह लोकायत आणि युक्रांद या संस्थांनाही गौरविले जाणार आहे.
सचिन ईटकर, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे विराज तावरे, संयोजक
जाहिरात