गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*संयुक्त प्रसाद मित्र मंडळ*
*नारायण पेठ, पुणे*
१७ ऑगस्ट २०२४
*देवसेवे कडून मानव सेवेकडे*
“विद्यार्थी शैक्षणिक दत्तक सेवाकार्य” !!
Pune : संयुक्त प्रसाद मित्र मंडळातर्फे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दि. 17 ऑगस्ट 2024, रोजी नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ, पुणे येथील 3 गरजू विद्यार्थ्यांना *’शैक्षणिक दत्तक’* घेण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित परांजपे यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थी सेवेचा धनादेश शाळेच्या मुख्याध्यपिका माननीय सौ. कल्पना वाघ मॅडम यांचेकडे सुपुर्त केला. याप्रसंगी मंडळाचे सेवाकार्य प्रकल्प प्रमुख श्री. अमोल भालेराव, खजिनदार गुरुदत्त डिंगरे,उत्सव प्रमुख दीपक उभे, सुनिल मोहिते , मयूर शिंदे तसेच प्रसन्न शिवरकर व बाल कार्यकर्ते शार्दूल उभे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मा. मुख्याध्यापिकांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि आभार मानले.
उपक्रमासाठी मदत केलेल्या सर्व आश्रयदात्यांचे हार्दिक आभार…
आपले स्नेहांकीत
अजित परांजपे
अध्यक्ष
*संयुक्त प्रसाद मित्र मंडळ*
*नारायण पेठ, पुणे*
9422332941
जाहिरात