गोल्डन आय न्यूज नेटवर्क
राज्यात यंदा उद्भवलेली पूरस्थिती मानवनिर्मित म्हणावी लागेल की यात यंत्रणाचा दोष आहे. !!
पुणे : नंदकुमार वडनेरे हे म्हणाले मला जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता म्हणून क्षत्रिय पातळीवर काम करता आले . जलसंपदा विभागाचा सचिव म्हणून प्रशासकीय धोरणात्मक कामाचा अनुभव मिळाला. कृष्णा पाणीटंटा लवादात महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या समितीचा सदस्य म्हणूनही मी काम केले आहे निवृत्तीनंतर भीमा कृष्णा खोरे पूरस्थिती विषयक कारणे व उपाय अभ्यास समितीचे नेतृत्व माझ्याकडे होते .
या साऱ्या प्रवासात मला एका गोष्टीचे खूप वाईट वाटले ती बाब म्हणजे पावसाळ्यात पूर आल्यानंतर साऱ्या व्यवस्थेला नद्यांची आठवण होते एरवी आठ महिने नद्यांचीअवस्था अडगळीत टाकलेल्या आजी आजोबा सारखी असते मानवीज्ञात इतिहासाच्या वाटचालीत नद्या उगम पावल्या लुप्त झाल्या संत वाहिल्या नद्यांना पूर आले आणि गेले आहेत पूर हे नदीचे व्यवस्थापक लक्षण आहे अति पाऊस होणे नदीने दुथडी भरून वाहने पूर येणे ह्या साऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कधी ना कधी होत आलेले आहे इथून पुढेही होईल .
आपल्या या कॉस्मो पोलिटन कल्चरमध्ये आपण नद्या नासवल्या आहेत त्यांना गुलाम बनवले आहेत त्यांचे हाल केले आहेत त्यामुळे आता आपल्याला पूर हे नैसर्गिक न वाटता एक संकट वाटू लागले आहे आता हे सर्व सांगून झाल्यानंतर तुम्हाला खात्रीपूर्वक जाणीव होईल की नैसर्गिक पूरस्थितीची समस्या होण्यास मानवनिर्मित व्यवस्थाच कारणीभूत आहे.
कृष्णा व भीमा खोऱ्यातच पूर समस्या वारंवार उद्भवत आहेत तुमच्या अभ्यासातून नेमके काय लक्षात आले ,?
हा अभ्यास माझ्या अध्यक्षतेखालील समितीने केला त्यात अनेक मान्यवर होते भीमा खोऱ्याचा अभ्यास आणि उपाय हा अहवाल मुख्यत्वे राजेंद्र पवार यांनी केला. पूरस्थिती ला बांधकामे कितपत जबाबदार आहेत पूर कशामुळे आलेत अलमपट्टी व इतर धरणामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती तयार होते का? भविष्यातील पूर संकट टाळण्यासाठी उपाय काय असावेत या प्रश्नांचा अभ्यास आम्ही केला. . याशिवाय धरणामधील सुधारित जलाशय परिचालन यंत्रणा कशी असावी नदीत सोडले जाणारे पाणी एकाच व्यवस्थेत कसे मोजावे पूर प्रवण क्षेत्रात बांधकाम आहेत काय व त्याचे नियंत्रण कसे करावे अपत्कालीन कृती आराखडा कसा असावा हे देखील मुद्दे अभ्यासले गेले .
जाहिरात