अमृतप्रभा समूहगान स्पर्धेचा निकाल जाहीर !!
पुणे : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेत एंजल मिकीमाईन स्कूल, न्यू इंडिया इंग्लिश मीडिअम स्कूल, कोथरूड, पुणे आणि एच. एच. सी. पी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हुजुरपागा लक्ष्मी रोड यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या इच्छेनुसार गतवर्षीपासून ‘अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा’ सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या वर्षी जिल्ह्यातील शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय मिळून 110 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच देशाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी म्हणून या वर्षी विद्यार्थ्यांना ‘प्रार्थना’ या विषयावर गीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
अरविंद काळगावकर, माधव मोडक, राहुल गोळे, चित्रा देशपांडे, डॉ. अश्विनी वळसंगकर व अजय पराड यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेचे संयोजन डॉ. भारती एम. डी., संतोष अत्रे व प्रसाद भडसावळे यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम यांनी सहभागी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अत्रे प्रशाला येथे विदुषी गायिका सावनी शेंडे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट इ. 5वी ते 7वी
प्रथम : एंजल मिकीमाईन स्कूल
द्वितीय : शेठ आर. एन. शहा इंग्लिश मिडियम स्कूल, कसबा पेठ पुणे
तृतीय : एस. एस. एस. डी. सह्याद्री नॅशनल स्कूल वारजे माळवाडी पुणे
उत्तेजनार्थ : अभिनव विद्यालय कर्वे रोड, पुणे
उत्तेजनार्थ : इनोव्हेरा स्कूल कदमवाक वस्ती
गट इ. 8वी ते 10वी
प्रथम : न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कोथरूड पुणे
द्वितीय : एच. एच. सी. पी. हायस्कूल हुजुरपागा लक्ष्मीरोड पुणे
तृतीय : आबासाहेब अत्रे इंग्लिश मिडियम स्कूल पुणे
उत्तेजतार्थ : नू. म. वि. मुलींची प्रशाला व जुनिअर कॉलेज
गट कनिष्ठ महाविद्यालय
प्रथम : एच. एच. सी. पी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हुजुरपागा लक्ष्मीरोड पुणे
उत्तेजनार्थ : युनिक इंग्लिश मिडियम स्कूल कात्रज, पुणे
उत्तेजनार्थ : एस. एन. डी. टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय.
_–_—————————————_———___—-
जाहिरात