गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘गानवर्धन’च्या नवोन्मेष युवा पुरस्कारांची घोषणा रेणुका टिकारे-केळकर, मंदार बगाडे पुरस्काराचे मानकरी !!
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात 45 वर्षांपासून कार्यरत असलेल्या गानवर्धन संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या नवोन्मेष युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
नवोन्मेष कथक नृत्य युवा कलाकार पुरस्कारासाठी रेणुका टिकारे-केळकर यांची तर शास्त्रीय संगीतामधील नवोन्मेष संगतकार पुरस्कारासाठी तबला आणि सारंगीवादक मंदार बगाडे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 27 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शाल, स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रेणुका टिकारे-केळकर या ज्येष्ठ विदुषी डॉ. सुजाता नातू आणि ऋतुजा सोमण यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेत आहेत. मंदार बगाडे हे तबला वादनाचे प्रशिक्षण धनंजय पंडित यांच्याकडे तर सारंगी वादनाचे प्रशिक्षण पं. किशोर दातार आणि पं. मोहनकुमार दरेकर यांच्याकडे घेत आहेत. अनेक कार्यक्रमांमधून त्यांनी सारंगीवादन केले आहे. पुरस्कार ज्येष्ठ कथक नृत्यगुरू डॉ. सुजाता नातू यांनी पुरस्कृत केले आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात