गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : लोकसेवा मंडळ आॕल इंडिया(एन.जी.ओ.)च्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी आत्माराम ढेकळे व जिल्हा उपाध्यक्ष पदी नारायण उदावंत यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी जाहीर केल्यानुसार त्याचे नियुक्तीपत्र नुकतेच वितरण करण्यात आले.
अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एंव शोध संस्थान चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामचंद्र कपिले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोककला सेवा मंडळ आॕल इंडिया चे पुणे जिल्हा अध्यक्ष नामदेव सुवर्णकार व जिल्हा सचिव मधुकर टोंपे यांनी हे नियुक्ती पत्र शनिवारवाडा ,पुणे परिसरात एका बैठकीचे आयोजन करुन आत्माराम ढेकळे व नारायण उदावंत यांना त्यांना नियुक्त केलेल्या पदानुसार देण्यात आले.
लोककला सेवा मंडळ आॕल इंडिया च्या माध्यमातून पारंपारिक कला जोपासत असलेल्या कलावंताची माहिती घेऊन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने व प्रबोधनात्मक कार्य करण्यात येईल.
तसेच भव्य कलावंत मेळावा देखील आयोजित करण्यात येईल.व त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे याप्रसंगी सिने -नाट्य कलावंत व या संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम ढेकळे यांनी या बैठकीत आपल्या मनोगतपर भाषणात व्यक्त केले.
——————————–————-–—————-
जाहिरात